► माझा महाराष्ट्र    

     


 १) स्थापना :- 1 मे 1960.


     • महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम  एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व  लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य.महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्यांची सीमा गुजरात, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ ,तेलंगणा ,कर्नाटक, गोवा आणि दादर नगर हवेली या  केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला  अरबी समुद्राची किनारपट्टी आहे.                                                                                               




  २) राजधानी- मुंबई:-


  •  मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. मुंबई ची लेखसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे . हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे .मुंबई हे भारतातील दक्षिण , पश्चिम, आणि मध्य आशियातील सर्वात जास्त वार्षिक सकाळ उत्पन्न असलेले शहर आहे . आपल्या उपनगरांसोबत मुंबई हे जगातील ५ वे सर्वात मोठे शहर आहे . मुंबई  शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते .

 ३) उप राजधानी - नागपूर :-

    • हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील  तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व  राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन  नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. तसेच टायगर कॅपिटल ऑफ इंडिया  पण संभोतात. नागपुरास संत्रानगरी असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर संत्र्याचे पिके येथे होतात. संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे.


  ४) जिल्हे - 36. 

विभागाचे नाव
(मुख्यालय)
क्षेत्रजिल्हेमोठे शहर
अमरावती विभाग
(मु:अमरावती)
विदर्भअकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिमअमरावती
औरंगाबाद विभाग
(मु:औरंगाबाद)
मराठवाडाऔरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणीऔरंगाबाद
कोकण विभाग
(मु: मुंबई)
कोकण
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग
मुंबई
नागपूर विभाग
(मु: नागपूर)
विदर्भ
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
नागपूर
नाशिक विभाग
(मु: नाशिक)
खानदेश
नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर
नाशिक
पुणे विभाग
(मु: पुणे)
पश्चिम महाराष्ट्रपुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरपुणे


   ५)  क्षेत्र- 307,713 चौ.कि.मी.  
     
   ६) क्षेत्रफळ क्रमांक- तिसरा    

   ७) लोकसंख्या:-  एकूण -112,374,333

   ८) घनता- 370 / चौ.कि.मी.     

   ९)जीडीपी- 28.78 लाख कोटी      

 १०)वाहन नोंदणी- एमएच  MH


 ११) अधिकृत भाषा- मराठी  

 

   •  मराठी ही  इंडो -युरोपीय भाषा कुळातील एक भाषा आहे .भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे .
महाराष्ट्र आणि गोवा  मराठी ही  अधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी हि जगातील पंधरावी तर भारतातील चौथी भाषा आहे . 

 १२) सर्वात मोठे शहर- मुंबई.


 १३) सर्वात मोठे तलाव-लोणार सरोवर   

    • लोणारचे सरोवर महाराष्ट्र  राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील  खाऱ्या पाण्याचे तिसरा सरोवर  आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे  झाली. सरोवर औरंगाबाद  शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे.










१४) सर्वात मोठ धरण- कोयना धरण:-

कोयना धरण  १९६३ मध्ये बांधले गेले . हे सांगली जिल्ह्यतील कोयना नदीवर बांधले गेले आहे . हे  सर्वात मोठे धारण आहे . याची  क्षमता १८७८ टिएमसी आहे आणि १९२० मेगावॅट  उत्पन्न करते .

१५) सर्वात मोठा जिल्हा- अहमदनगर 



  • अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे.आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला जिल्ह्यआहे हे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याचलजिल्ह्यात आहे ते राहता तालुक्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत.

१६) सर्वात लांब नदी - गोदावरी





गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा , प्रवरा , वैनगंगा , मांजर इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठ नदी असे म्हणतात.
  गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होते असते. नदीतुन वाहणार्‍या  पाण्यापैकी ८०% पाणी जुलै -ऑक्टोबर  या चार महिन्यांतच वाहुन जाते.नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट  पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी.(समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते.आपल्या पाण्यामुळे गोदावरीस [महाराष्ट्र] व [आंध्र प्रदेश] राज्यांची जीवनवाहिनी समजतात.ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. 

 १७) सर्वात मोठा एमआयडीसी परिसर - पालघर जवळ भोईसर.


  १८) सर्वात मोठा / उंच किल्ला - तोरणा किल्ला



१९) राज्य फूल- जारुल.



  • ताम्हण (किंवा तामणजारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्‍नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मे च्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने =याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. 


२०) राज्य   प्राणी- शेकरू 



 शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.                         

 २१) राज्य पक्षी - हरियाल



  • हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे. याला हिरवा होलाहरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे संदर्भ हवा ]. याचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा’.


 २२) राज्य खेळ- कबड्डी.




 २३) राज्य वृक्ष - आंबा



 २४) राज्य नृत्य - लावणी 



 २५) महाराष्ट्रातील  प्रमुख धरणे 

   ► कोयना धरण. :


             

    ► उजनी धरण :


   ► जायकवाडी धरण :



    ► धामणी 




    ► खडकवासला धरण :



    ► राधानगरी धरण :



  ► हतनूर धरण



  ► मुळा धरण : 



    ► गिरणा धरण : 



    ► पवना धरण : 



  २६) प्रादेशिक विभाग :-


   » कोकण विभाग

  »पुणे विभाग

  »नाशिक विभाग

  »औरंगाबाद विभाग

  »अमरावती विभाग

  »नागपूर विभाग


  २७) महाराष्ट्राचे वैशिष्ठय :-


» महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी  झाली. 

» लोकसंख्याच्या दृष्टीने भारतातील दुसरे मोठे राज्य हे महाराष्ट्र आहे.

» भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे .

» भारत देशाला सर्वांत जास्त GDP ( वार्षिक सकल उत्त्पन्न) महाराष्ट्र राज्यकडून मिळते. ( २९.७९ लाख - ४३० billion dollar).

» सर्वांत जास्त औद्योगिकीकरण महाराष्ट्र राज्याचे झाले आहे.

» महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वाधीक श्रीमंत राज्यांमध्ये मानलं जात.

» महाराष्ट्रा ची राजधानी मुबंई जी भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

» भारतातील सर्वांत मोठे शेअर बाजार हे महाराष्ट्रातील मुबंई शहरात आहे.

» देशातील सर्वाधिक मोठे कांद्याचे व्यापार पेठ हे नाशिक जिल्ह्यात आहे व सर्वाधिक कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.

» भारतातील पाहिलं ट्रेन ही महाराष्ट्रात धावली होती जी १६ एप्रिल १८५३ रोजी मुबई व ठाणे या मार्गावर धावली होती.

» नागपूर हे असे शहर आहे जे इतर कोणत्याच राज्याची राजधानी नसून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची ब्रँच तेथे आहे.

  
» महाराष्ट्रात एकूण ३५० गडकिल्ले असतील त्या मधील बरेच किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले होते.

» महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे जे भारतातील एकमेव खाऱ्यापाण्याचे सरोवर आहे.

» नांदुरा येथे जगातील सर्वांत मोठी हनुमान मूर्ती आहे.

» महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत.

» पर्यटकांचे आकर्षित ठिकाण म्हणजे अजिंठा - वेरूळ जे महाराष्ट्रातील औरंगांबद जिल्ह्यात आहे.

» महाराष्ट्राला हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे केंद्रबिंदू मानले जाते.

» भारतातील पहिला चित्रपट महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात दादासाहेब फाळके नी प्रदर्शित केला होता.

» महाराष्ट्राचे क्षेत्रफळ कुवेत ,
पनामा, फिजी, कतार, ओमन, भूतान या देशांना पैकी अधिक आहे

» मराठी बोलणाऱ्याची संख्या ६२,४८१,६८९ 

» महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे 

» देशातील पहिली रेल्वे  महाराष्ट्र धावली. १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर  ते ठाण्यादरम्यान धावली .

» महाराष्ट्र १९ थंड हवेचे ठिकाण   आहेत

» महाराष्ट्रतील नवी मुंबई  हे जगातील सर्वात मोठे नियोजित शहर आहे

» देशातील सर्वाधिक रस्ते असणारे राज्य 


» महाराष्ट्रत एकूण ३६  जिल्हे २०१४ सली अस्तित्व अलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा .

» एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्न पैकी १३ % उत्पन्न एकट्या   महाराष्ट्रतून होते.

» महाराष्ट्रतील प्रमुक उद्योगधंदे: रासायनिक आणि संबंधित उत्पादने , विधुत्त आणि साधी यंत्रे , कापड , पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग .

» इतर महत्वाचे उद्योगधंदे- धातू उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियात्रिकी समान , यांत्रिक समान,पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.

» महत्वाची पिके - आंबा, द्राक्ष, संत्री, गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी आणि कडधान्य.

» महत्वची नगदीपिके - शेंगदाणे कापूस, ऊस, तंबाखू, हाळकुंड.

» महाराष्ट्रातील नाशिक येथे नोटांची छपाई केली जाते

» धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.


» औरंगाबाद दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते.  एकूण 52 दरवाजे बांधले गेले.


» नवापूरचे रेल्वे स्थानक दोन राज्यात बांधले गेले आहे अर्धा महाराष्ट्र आणि इतर अर्धा गुजरात आहे.




 २८) महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने:-

  » ताडोबा राष्ट्रीय उद्यान 
  » नावेगाव राष्ट्रीय उद्यान
  » पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
  » संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
  » गुगामल राष्ट्रीय उद्यान
  »चांदोली   राष्ट्रीय उद्यान 


 २९) महाराष्ट्रातील लघुउद्योग 






  • सोलापूर - चादरी 




  • नागपूर- सुटी व रेशमी साडया 




  • नाशिक येवले)-पितांबर व पैठण्या 




  • इचलकरंजी-सद्य व लुगडी 




  • अहमदनगर - सुती  व रेशमी साड्या 




  • भिवंडी - हातमाग उद्योग




  • गोंदिया ,सिन्नर ,कामठी - बिड्या तयार करणे 




  • नाशिक (मालेगाव ) - हातमाग उद्योग




  • ठाणे (वसई )- सुकेळी 




  • चंद्रपूर ( सबली  व नागभीड )_  रेशीम कापड 
  • औरंगाबाद (पैठण )-पैठणी व हिमरुषाली 




  • सिधुदुर्ग (सावंतवाडी )- लाकडी खेळणी




  • भंडारा (एकोडी  )- कोशा  रेशीम 


      ३०)महाराष्ट्रातील लहान मोठे * 





  • महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा -रत्नागिरी 
  • महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर - कळसुबाई (१६४६ मीटर 
  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा -मुंबई शहर 




  • महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर




  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह - षण्मुखानंद 




  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी - मुंबई 




  • महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा - रेगूर   मुद्रा 




  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ  - बल्लारपूर ( चंद्रपूर)




  • महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा - सिंधुदुर्ग 




  • महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात जास्त घनता असलेला जिल्हा - मुंबई 




  • महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा - ठाणे 




  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी 




  • महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा - अहमदनगर 
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचित क्षेत्र असलेला जिल्हा - अहमदनगर 




  • महाराष्ट्रातील सर्वाधिक  रेल्वे  -  महाराष्ट्र एक्सप्रेस ( कोल्हापूर-गोंदिया )




  • महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस ( पुणे-मुंबई)




  • महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - सोलापूर 




  •   ३१) महाराष्ट्रातील शिखरे उंचीनुसार.

       » कळसूबाई -------1646मी.----------अहमदनगर 
       » साल्हेर -----------1567मी-----------नाशिक
       » महाबळेश्वर ------1438मी.—---— सातारा
       » हरिश्चंद्रगड –-----1424मी.----------नगर
       » सप्तश्रुंगी —-----1416मी.—-------नाशिक
       » तोरणा -----------1404मी.—-------पुणे
       » अस्तंभा -------- 1325मी ———नंदुरबार
       » त्र्यमबकेश्वर -----1304मी.——----नाशिक
       » तौला —---------1231मी.-----------नाशिक 
       » बैराट ------------1177मी. —------–गविलगड टेकड्या
       » चिखलदरा ----- 1115मी.—---—– अमरावती
       » हनुमान—-------1063मी.——-----धुले

    •             

     ३२) महाराष्ट्रातील काही  बोली भाषा     


        • मराठी ही महाराष्ट्राची प्रमुख भाषा आहे. तसेच महाराष्ट्रात विविध भागात मराठीच्या काही बोली भाषा बोलल्या जातात.मराठीच्या बोलीभाषेच्या उच्चारात, शब्दसंग्रहात,वाकप्रचारात दर 20किमी मध्ये बदल होतात.मराठीच्या काही मुख्य व उप बोलीभाषा:-
     कोंकणी मराठी,कोल्हापूरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी,नागपुरी,वऱ्हाडी, बेळगावी,मालवणी,मोरस मराठी,झाडी बोली,नंदुरबारी,खाल्यांगी,वर्ल्यांगी,तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी,गोंडी,भिल्ल, वारली,पावरी,मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया.
           मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठाकरी, 'आरे मराठी', बंजारा, कोलामी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, ढोर-कोळी/टोकरे कोळी (खानदेश)घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी,गोरमाठी,लेवा,डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, वगैरे.




    1 Comments

    Previous Post Next Post