सुविचार, म्हणी, चारोळ्या संग्रह.

सुविचार

       
*तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा . नकारात्मक विचार करतात .

 * हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे सर्वात चांगले . त्यानंतर प्रत्येक वेळी तुमचा विजय निच्छित आहे.


*तिरस्कार पापाचा करा पापी माणसाचा नको.


*दुःखच सर्वात मोठं कारण जास्त विचार करणं आहे


*परिवार हे फक्त रक्ताच्या नात्यांनी बनलेले नसते तर अडचणीच्या वेळी येणारे मदतीचा प्रत्येक हात परिवाराचा सदस्य असतो



*निर्बुद्ध लोक दुसऱ्यांवर हसतात आणि बुद्धिवान स्वतःवर



*आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे


*दुःख हे कधी दागिन्यांसारखे मिरवू नका,

वाटू शकलात तर आनंद वाटा,
लोक तुमच्या कडून आनंदाची अपेक्षा करतात.
कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर आहे.

*माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या कामामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात.                      

*खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो,घेण्यात किंवा मागण्यात नसतो.                             

                                                                        *जीवन फुलासारखेअसू द्या पण ध्येय मात्र मधमाशी साखर असुद्या.                 


*आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहेत,हे महत्वाचे नाही.तुमच्या मुळे कितीजण आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.

*प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.

*माती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन यातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.

*मोठा माणूस बनने चांगली गोष्ट आहे.पण चांगला माणूस बनणे खूप मोठी गोष्ट आहे.

*उजडणारी प्रत्येक सकाळ आपणास दोन प्रयास देऊन जाते.झोपून स्वप्न पहात रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

*जगू शकलात तर चंदनासारखे जगा,स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या.

*जे आपण झोपेत स्वप्न बघतो,ते खरं स्वप्न नसतं तर जे आपली झोप उडवत ते खरं स्वप्न असतं.

*रात्र नाही स्वप्न बदलते,दिवा नाही वात बदलते,मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा,कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. 

*पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.

*माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसतं आणि ते शोधण्यातच त्याचे संपूर्ण आयुष्य संपत ......ते म्हणजे  समाधान.

*व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .

*जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.

*भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास. हाच विकासाचा पाया आहे.

*दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

*दरवेळी मोठी पावले टाकने गरजेचे नसते , छोट्या छोट्या पावलाने पर्वत चढला  जातो..


*तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

*नात्याची गरज असावी पण गरजेपुरत नातं कधीच नसाव.

*संयम नसणारा बुद्धिमान मनुष्य आंधळ्या मशालजी प्रमाणे आहे. कारण हा मशालजी दुसऱ्यांना मार्ग दाखवतो; परंतु त्याला स्वतःला कधीच मार्ग सापडत नाही.


*'कष्ट ' आणि ' मेहनत ' एवढ्या शांततेने करायचं की आवाज फक्त आपल्या 'यशाचाच ' घुमला पाहिजे.

*स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

*अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .

*आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

*देण्यासाठी दान ,घेण्यासाठी ज्ञान आणि त्यासाठी अभिमान सर्वात श्रेष्ठ आहे.

*विद्या शिका आणि गरिबाले विद्ये साठी मदत करा.

*शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्या प्रमाणे  तुच्छ वाटतात.

*मित्र असे बनवा की,
ज्यांची  स्वप्न  तुमच्यासारखीच मोठी आहे

*नशिबात जे लिहिलेले आहे ते विधिलिखित कोणी बदलू शकत नाही.

*विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंतांच्या कृपे शिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही.

*चंद्र आणि चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो.

*पापरूपी अंधकार ज्ञानाचा प्रकाश पडताच नाहीसा होतो.

*प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.

*फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.

*प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जवळ असल्या,तर आयुष्यात अशक्य काहीच नाही

*जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,आणि द्लीद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.


*ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.

*ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.

*नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे.

*भीतीने घाबरून जावू नये भयभीत मनुष्या जवळ भये शीघ्रतेने येत असतात.

*वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपलेपणा ही खूप जन दाखवतात पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते

*हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.

*दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.

*माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.

*माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.

 *पुस्तकाप्रमाणे माणसांना पण वाचायला शिका कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसे अनुभव देतात.


 *ऊणाच्या तीव्र चटक्या पेक्षा आपमनचे चटके  माणसाला होरपळून टाकतात.

*आवड आणि आत्मविश्वास

असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

*वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्या आधी झिजावं लागतं

*जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.

*जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.

*दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.

*पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.

*पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.

*भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.

*माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.

*वैर प्रेमाने जिंकावे.

*शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, माणसे सगळी सारखीच आहेत.

*सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.

*जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे.नाहीतर लांबूनच सलाम आहे.म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..

*वेळ चांगली असो किंवा वाईट…!
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत
साथ देणं हीच आपली ओळख आहे..

*हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!

*मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत….
कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,,
ते मला चांगले ओळखतात..!

*सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..

*जग जिंकण्यासाठी Attitude नाही,
फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत,
गोड स्वभाव आणि Cute Smile..

*बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो.

*बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो.

 *हरवलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा शोधू शकतो बदललेल्या व्यक्तीला आपण पुन्हा मिळू शकत नाही

*माझा माझ्यावर विश्वास आहे का?
स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा
यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..

*जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.

*जीवनात वेळ कशी हि असो.
वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते,
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील

 *प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

 *स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

*क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

 *प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..

*समाधानी राहायला शिकले की सुखी आपोआपच होता येते.

*माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.

 *देवापेक्षा कर्माची भीती बाळगा एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही .

*माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो

*एकदा वेळ निघून गेली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..

*तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगती होत आहे..


































































म्हणी:
१.अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्याचा शेवट दुःखात होतो.


२. अति शहाणा त्याचा बैल रिकामा- जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याच्याकडून कोणतेही उपयोगी किंवा मोठे काम होत नाही.


३. आधी पोटोबा मग विठोबा - स्वतःचा फायदा प्रथम पाहून नंतर इतरांचा फायदा पाहणे.


४. आपलेच दात,आपलेच ओठ- आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे झालेली अडचणीची स्थिती.


५. इकडे आड तिकडे विहीर- दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती.


६. उंदराला मांजर साक्ष - परस्परांच्या स्वार्थासाठी लबाड माणसांनी एकमेकाला साथ देणे.


७. एका हाताने टाळी वाजत नाही - दोघांच्या भांडणाबाबत एकट्याला दोष देता येत नाही.


८. एका माळेचे मणी - सगळेच सारखे, सगळे सारख्या वृत्तीचे.


९. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - एखादा मनुष्य आपल्या नातेवाईकांच्या नाशाला कारणीभूत होतो.


१०. कामपुरता मामा - आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा.


११. खाण तशी माती - आईबापाप्रमाणेच  त्यांची मुले, जसे घराणे तसे संस्कार व विचार.


१२. गर्जेल तो पडेल काय - केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही.


१३.गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाचा गर्व केव्हातरी उतरतो.


१४. घरोघरी मातीच्या चुली - सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्तिथी असते.


१५. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला परिस्थिती केव्हातरी अनुकूल होतेच.

१६. चोराच्या उलटया बोंबा - स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे.

१७. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - दुसऱ्याच्या स्थितीत स्वतः जावे तेव्हा तिचे खरें ज्ञान होते.

१८. झाकली मूळ सव्वा लाखाची - आपण होऊन आपली परिस्थिती उघड करून दाखवू नये.

१९. तोंड दाबून बुक्क्यांचा मार - एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही मोकळा न ठेवणे.


२०. थेंबे थेंबे तळे साचे - शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंच्या हळूहळू संग्रह केला असता कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो.


२१. दगडापेक्षा वीट मऊ - निरुपाय म्हणून  मोठया संकटापेक्षा लहान संकट बरे.


२२. दिव्याखाली अंधार - चांगल्या गोष्टीतच कित्येकदा ठळक दोष असतात.


२३. दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.


२४. दुष्काळात तेरावा महिना - अगोदरच्या संकटात आणखी भर.


२५. नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने - दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या  मार्गात अनेक अडचणी येतात.


२६. नाव मोठं , लक्षण खोटं - बाहेरचा भपका मोठा , पण कृतीच्या नावाने मात्र शून्य .


२७. नवी वीट , नवे राज्य - सगळीच परिस्थिती नवीन असणे.


२८. पाचामुखी परमेश्वर - बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे.

२९. पी हळद , हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे , झटपट परिणामांची अपेक्षा ठेवणे .


३०. पळसाला पाने तीन - सर्वत्र सारखी परिस्थिती असणे .


३१. पुडच्यास ठेच , मागचा शहाणा - दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरू मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो.


३२. बडा घर पोकळ वासा - दिसण्यात श्रीमंती पण प्रत्येक्षात ती नसणे. 


३३. बळी तो कान पिळी - बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो.


३४. बापसे बेटा सवाई - वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार .


३५. येरे माझ्या मागल्या - एखाद्याने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पूर्वीप्रमाणे वागणे.


३६. रात्री थोडी सोंगे फार - कामे भरपूर पण वेळ थोडा .


3७. लेकी बोले सुने लागे - एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.


३८. लंकेत सोन्याच्या विटा - लांबवर असलेल्या फायद्याच्या गोष्टींचा आपल्याला उपयोग नसतो.


३९. वासरांत लंगडी गाय शहाणी - मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा  ठरतो.


४०. सगळे मुसळ केरात - महत्त्वाच्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सगळे श्रम व्यर्थ ठरतात.


४१. हातच्या काकणाला आरसा कशाला? - स्पष्ट दिसत असलेल्या गोष्टीला पुरावा नको.


४२. अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखाद्या बुद्धिमान , सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख , दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते .

४३. असतील शिते तर जमतील भूते - एखाद्या कडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळाहोतात.

४४. असंगाशी संग प्राणाशी गाठ - दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो.

४५. आपण हसे लोकाला, शेंबूडआपल्या नाकाला - ज्या दोषांबद्दल आपण दुसऱ्यांना हसतो तोच आपल्या अंगी असणे.

४६. आयत्या बिळावर नागोबा - एखाद्याने स्वतः साठी केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने फायदा घेण्याची वृत्ती असणे.

४७.  आंधळा मागतो एक डोळा ,देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

४८. आंधळ्या - बहिऱ्याची गाठ - एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे.

४९. उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी थोडासा गुण असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे.

५०. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - अतिशय उतावळेपणाने  वर्तन करणे.

५१. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये- कोणत्याही चांगल्या गोष्टींचा किंवा एखाद्याचा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

५२. वरातीमधून घोडे- एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते.





























































..
































































































Post a Comment

Previous Post Next Post