" अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मर्धि वर्तते "

  अर्थात , शितावरून भाताची परीक्षा बघू नये. कदाचित एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण निदर्शनास येत नसतील तर त्या व्यक्तीला आपण वाईट ठरवणे हे चुकीचे ठरेल. 

    आज २१व्या शतकात समाजात अनेक प्रकारची नाविन्यता दिसून येते पूर्वीचा समाज आणि हळूहळू त्या समाजाची आधुनिक विचारांत आणि बदलांकडे होणारी वाटचाल ही प्रभावी आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वी स्त्रीला फक्त 'चूल आणि मुलं' हाच मंत्र माहीत होता, परंतु हळूहळू शैक्षणिक प्रगतीमुळे आणि आधुनिक काळात होणाऱ्या प्रगतीमुळे घरांच्या चौकटीमध्ये बांधली गेलेली 'स्त्री' आज आपल्याला वेगवेगळ्या पदांवर पोहचलेली दिसते . समाज ज्या स्त्रीला कमजोर समजत होता, आज तिचं 'स्त्री' देशपातळीवर कार्यरत आहे, तर कधी समाजाच्या प्रगतीला कारणीभूत ठरत आहे, हेच सांभाळता-सांभाळता कौटुंबिक जबाबदारी ही ती व्यवस्थितपणे पार पाडत आहे.

    समाज - समाजातील लोक तीच आहेत , बदल फक्त दृष्टिकोनातील हवा आणि तो काही प्रमाणात पाहायला देखील  मिळत आहे.
    पण खंत वाटणारी गोष्ट म्हणजे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगणारा समाज आजही अनेक अंधश्रद्धांना बळी पडतो आहे . आपल्या अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी बरेचदा ढोंगी साधूंचा आधार घेतला जातो . अनेकदा सुशिक्षित वर्ग ही याच मार्गाकडे वाटचाल करतो. मग हेच समजत नाही , की नक्की कोणती बाजू कमी पडते , 
  शैक्षणिक की स्वः जाणिवेची? 
     परंतु असे असले तरी ही आज कुठेतरी या सर्वाविरुद्ध आवाज उठवणारा आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करतो, आणि वैयक्तिक पातळीवर या विरोधात लढतो. पूर्णतः नाही , परंतु थोड्या प्रमाणात का होईना समाज सावधानतेकडे प्रवास करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post