![]() |
| MAITRI |
…ती मैत्री…
मायेचे थोरपण, गर्वाचे धिटेपण
ती मैत्री...
आयुष्यभर मिळणारी सुखाची साथ
ती मैत्री...
रखरखत्या जमिनीवर मायेचा ओलावा
ती मैत्री...
खचलेल्या नि दुखावलेल्या मनाचा आधार
ती मैत्री...
लांब असूनही जवळच असणारी
ती मैत्री...
क्षणात मनात घर करून आयुष्यभर साथ देणारी
ती मैत्री...
चिंतेने व्याकुळ मनाला न अश्रूंना थारा देणारी
चिंतेने व्याकुळ मनाला न अश्रूंना थारा देणारी
ती मैत्री...
शब्दांत न बांधता येणारे ऋणानुबंध म्हणजे..
ती मैत्री...
एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी होणारा संगम
ती मैत्री..
चुकल्यावर हक्काने ओरडणारी , पण पुन्हा लाडाने समजावणारी
ती मैत्री...
अबोल्यातही डोळ्यांतून बोलकी करणारी
ती मैत्री...
एकमेकांच्या सुख, दुःखात सांगती,
ती मैत्री...
न बोलताही असंख्य भाव जाणणारी ,
ती मैत्री...
असंख्य प्रश्नांचे एक गोड उत्तर,
ती मैत्री...
न भेटताही , रोज एकमेकांना मनाने भेटणारी ,
ती मैत्री...
दोन अक्षरांपलिकडच्या नात्याची जाणीव,
ती मैत्री...
शब्दांतून व्यक्त होऊनही , अव्यक्त राहणारी भावना ,
ती मैत्री...
अशा गोड , मजेदार आठवणींचे बंद भांडार
ती मैत्री
अशा तुझ्या नि माझ्या गोड नात्याचे नाव म्हणजे ,
मैत्री...