*"आजचा शेतकरी काय म्हणतो !"*
नमस्कार मंडळी ! "मी एक सामान्य शेतकरी ,घाबरु नका मी काय आज माझी व्यथा मांडायला आलेलो नाही किवा कोणाचीच तक्रार देखील करायला नाही आलो तेव्हा निश्चिंत असा"
आज तर मी तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगायला आलो आहे . तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की , आज सर्वत्र कोरोना नावाच्या आजाराने जगभर आपले थैमान माजवलय तसेच अनेक उद्योगधंदे , व्यवसाय बंद पाडलेत , अनेक कंपन्या बंद पडल्यात , अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेक लोक बेरोजगार झालेत पण शेतकरी मात्र आजही त्याच्या शेतीत काम करतोय त्याचा व्यवसाय आज ही चालू आहे
आज मी एकटा बोलत नाही बरं, माझ्या या देशात असणाऱ्या त्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या वतीने बोलत आहे. आज जसे अनेक प्रश्न माझ्या मनात आलेत तसे त्यांच्या ही मनात आहेत. मग आज त्याच प्रश्नांची उत्तर मागायला आलेलो आहे.
तुम्हीच म्हणता शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा ,आमचा अन्नदाता आहे . आमचा हा भारत कृषिप्रधान देश आहे . असे अभिमानाने सांगता .
प्रश्न असा आहे, तुम्ही कधी शेती केली आहे का ?
तुम्ही कधी दुष्काळात धरार पडलेल्या जमिनीत नव्याने सुरुवात करून सोन्यासारख पीक उगवलय का ?
तसे प्रश्न विचारत बसलो तर रात्र होईल आणि तुम्ही कंटाळाल मला म्हणाल काय विचारत बसला हा ; आम्हाला काय एवढीच काम आहेत ,तुझ्या प्रश्नांची उत्तरे देत बसायला.
तसा गैरसमज करून घेऊ नका बर ,उत्तर नाही दिली तरी चालेल या प्रश्नांच्या उत्तरापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात आमच्या बद्दल असलेला गोड गैरसमज एकदाचा दूर होऊन जाऊदेत. खरं सांगायचं म्हटलं तर बोलणं खूप सोप्प असत ,पण करणं खूप अवघड असत. मागे काही वर्षां मध्ये अनेक माझ्या शेतकरी बांधवानी त्यांच्या कुटूंबासाठी स्वतः च्या जिवाचाच त्याग केला, तुमच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर दुर्बल , हतबल झालेल्या शेतकऱ्याने ' आत्महत्या ' केली एवढ सोपं वाटत हे बोलण तुम्हाला ! आम्हाला काय हौस नाय बर आत्महत्या करायची .
जसा अवघ्या समाजाचा पोशिंदा आहे मी , तसाच माझ्या कुटुंबाचा ही आहे बर जेव्हा मला कोणी असं सांगून जात की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला १,००,००० रू दिले जातात . तेव्हा नकळत माझ्या डोळ्यासमोर माझे आजारी असलेले म्हातारे आई वडील उभे राहतात , शिक्षणापासून वंचित असलेले माझे लेकर दिसतात . रोज या सगळ्यांना माझ्यासाठी स्वतः चे दुःख विसरून सांभाळ करणारी माझी बायको दिसते आणि क्षणात विचार येतो की १,००,००० रुपयात नक्कीच या सगळ्यांच्या समस्या दूर होतील. तुमच्या साठी हे पैसै खूप कमी असतील पण आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्या साठी खूप आहेत . किमान या पैशातून माझ्या लेकराच शिक्षण तरी थांबणार नाही असा विचार येतो आणि माहीत नाही पण लगेच डोळ्या समोर झाडlला लटकलेली दोरी दिसते आणि मी लगेच या दोरीत अट कुन घेतो आणि डोळे बंद होतात . आणि सर्वत्र मला सुखच दिसू लागत. मुलाचं शिक्षण चालू झालं आई वडिलांच दुखणं थांबल आणि बायकोच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं.
आता मला सांगा अस होणार असेल तर कोणात शेतकरी आत्महतेला नाही म्हणेल. तो हतबल नसतो ,दुर्बल ही नसतो . तो तर तुमचा बळीराजा असतो ना ! तुम्हाला मात्र माझ्या या दशेच खर कारण च जाणून घ्यायच नव्हत . माझी व्यथा तुम्ही रडून ऐकता आणि जगायला सांगताना हसून सांगता . मला याचे कधीच वाईट वाटले नाही . मी माझ्या धरती मातेशी सदैव प्रामाणिक असतो . माझ्या जीवनाशी प्रामाणिक, संपूर्ण समाजाशी प्रामाणिक आहे .
मी स्वार्थी नाही , मी आज ही तुमच्यासाठी हातात नांगर घेऊन तळपत्या उन्हात उभाच आहे बर
माझं पीक सोन्या सारखं उगवलं पण आज सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे मार्केट बंद आणि माझा माल घरीच आहे. खूप दिवस झाले तसाच पडून आहे . मग विचार केला असाच राहण्या पेक्षा मी स्वतः च गरजू पर्यंत पोहोचवायला काय हरकत. आज तुम्ही घरातच आहात जगण्या साठी आवश्यक वस्तूंची जाणिव झाली असेल त्या म्हणजे अन्न , पाणी , निवारा, वस्त्र हो का नाही !
अन्न तर मी तुमच्या साठी कमी पडू देणार नाही बर ,सरकार आज सगळ्या बेरोजगारांना पर्यंत अन्न धान्याची व्यवस्था करताय, त्यांना पैसे पुरवले जातात चांगलच आहे बर हे . मात्र मी माझ्या भांडवलाच्या निम्मं सुद्धा कमाई करू शकलो नाही , तरी मी काही तुमच्या समोर हात पसरवायला आलो नाही. ही तक्रार नव्हे फक्त जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न . मी सदैव च तुमचा बळीराजा असेल, फक्त तुम्ही मला दुर्बल समजू नका . परिस्थिती तीच तशी निर्माण होते की माझ्या बांधवांना तसे वागण्यास भाग पाडलं जातं यात मी त्यांना कधीच दोषी नाही
आता शेतकरी बाधव रडत बसणाऱ्यातला नाही . आज माझे बांध धावत्या युगाशी धावण्याचा प्रयत्न करताहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवताहेत . असे अनेक उदाहरणे तुमच्या समोर असतील . प्रत्येक गावात असा एक शेतकरी बांधव नक्कीच दिसेल. आता तो आत्महत्या नाही तर आत्मविश्वासाने काम करतो आहे .
आज अवघ्या समाजाला माझी गरज आहे तेव्हा मी मागे हटून चालणारा नाही . मी माझी कर्तव्य पार पाडतच आहे . आज ही मी माझ काम करणार पीक उगवणार तुमच्या पर्यंत पोहचते करणार .
आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल की माझे शेतकरी बांधव जाणून - बुजून हे करत नाही परिसथितीच तशी निर्माण होते की त्यांना तसे करणे भाग पडत . म्हणून तुम्हाला पटल असेल आम्ही शेतकरी दुर्बल नाही तर सहनशक्तीचा कळ आहोत
म्हणूनच आज विनंती करून जातोय , की आम्हा शेतकऱ्याच व्यथेच भांडवल करू नका मान सन्मान नाही मिळाला तरी चालेल पण किमान शेतकरी व शेती व्यवसायाला दुय्यम स्थान देऊ नका. तुम्हाला जसा तुमचा व्यवसाय श्रेष्ठ तसा मला माझा व्यवसाय श्रेष्ठ वाटतो . कधी तरी माझ्या स्थाना वर येऊन विचार करून पाहा मग लक्षात येईल कोणताच व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो .
शेवटी एकच ,
मी माझ्या भारत देशाला ' कृषिप्रधान ' याच नावाने ओळख करून दिली तर ती ओळख मी सदैव असेल याचा प्रयत्न करेल.
धन्यवाद........ . . . . !
related post
https://helpinghandspvr.blogspot.com/2020/04/shetkarimarathi1.html
