friends
आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नात्याला फार महत्व असते.पण मला जर कुणी प्रश्न केला की , या सर्व नात्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नातं कोणतं तर मी ' मैत्रीचं ' असं उत्तर देईल .
हे नातं इतर नात्यांपेक्षा सुंदर असतं , निरागसअसतं, इथे विचारांची जुळवणी होते . जात , धर्म ,पंथ असे भेदभाव इथे स्पर्श सुद्धा करत नाही , खरी मैत्री ही अशीच असते .
मैत्री म्हणजे मजामस्ती , हसणे , खिदळणे आणि शेवटपर्यंत साथ देणे . अडचणीच्या वेळी कोणी आले नाही तरी मित्र-मैत्रिणी नक्की धावून येतात,आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात पण दीर्घकाळ टिकणारं,कधी न तुटणार असं नातं म्हणजे मैत्रीचं,जे विश्वास आणि मदतीच्या आधारावर टिकलेले आहे.
आपल्याला हवं ते करण्याची मुभा या नात्यात असते . म्हणूनच मित्रमैत्रिणींपासून दूर गेल्यावर काहींच्या डोळ्यात आपसूकच पाणी येत . आपण मागे कधीतरी रडलेले दिवस आठवले की आता हसायला येत,आणि पूर्वी कधी मित्रांसोबत मनसोक्त हसलेले दिवस आता आठवलं की आता रडायला येत.कधी अबोल असलो तरी एकमेकांविषयी तेवढीच काळजी पण असते .
आयुष्याच्या पूर्वार्धात कधी डोकावून बघितलं तर एक नक्की जाणवेल की परीक्षेमधून मिळालेल्या गुणांमुळे आपल्याला कायमच सुख मिळतं असं नाही.पण लेक्चर बंक करून मित्रांसोबत केलेल्या मस्तीची आठवण आली की नेहमीच आपसूकच डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळतील .
आपण आपल्या जीवनात भरपूर धनसंपत्ती मिळवली,श्रीमंत झालो पण जर आपल्याकडे एकही जिवलग मैत्रीचं नातं असणारी व्यक्ती नसेल तर असे जीवन व्यर्थ वाटते .
पैशाच्या जोरावर माणूस त्याला हवे ते करू शकतो , हवी ती गोष्ट मिळवू शकतो पण पैश्याने जिवलग मित्र विकत घेऊ शकत नाही,त्यासाठी आर्थिक संपत्ती पेक्षा मनाची संपत्ती असायला हवी मनुष्य मनाने श्रीमंत असावा लागतो. "आयुष्यात जो खऱ्या मित्रांनी संपन्न असतो,ज्याच्याकडे खऱ्या मित्रांची संपत्ती असते तोच खरा श्रीमंत असतो."
पैसा तर आपण कधीही मिळवू शकतो आणि ते सोपे देखील आहे मात्र आपल्या सुख,दुःखात आपल्या सोबत असणारी माणस आपण सहजगत्या मिळवू शकत नाही.
मैत्री च नातं हे रक्ताचं नसलं तरी ते त्या नात्यापेक्षा अधिक मजबूत मानलं जात.म्हणूनच कदाचित याला इतके महत्व दिले जाते .
आपल्या सर्वांनाच माहित आहे की भगवान श्री कृष्ण आणि सुदामा हे मैत्रीचं एक आदर्श असं सुंदर उदाहरण आहे, खर तर फार पूर्वीपासूनच या नात्याला फार महत्व आहे .
जेव्हा सुदामा आपल्या मित्राला ( श्री कृष्णांना ) भेटण्यासाठी अनवाणी पायांनी चालत त्यांच्या दरबारात येतो तेव्हा श्री कृष्ण आपल्या मित्राला असं अनवाणी पायांनी आलेलं बघून,त्यांना झालेल्या वेदना पाहून त्यांचे मन अतिशय व्याकुळ होते,दुखी होते ते आपल्या मित्राला आसनावर बसवतात व त्याचे मळलेले पाय स्वतःच्या हातानी धुतात,खरे तर हे सामर्थ्य मैत्रीतच आहे नाहीतर सुदामा मध्ये कुठे इतकी शक्ती होती की तो भगवान श्री कृष्णांकडून आपले पाय धुऊन घेऊ शकेल .म्हणूनच असे म्हणतात की मैत्रीचं हे नातं ज्या व्यक्तीला आयुष्यभर जपता आलं तो कधीच आयुष्यात दुखी राहू शकत नाही .
आपले ते मित्रच असतात जे मनातील गोष्ट न बोलता समजावून घेऊ शकतात,आपल्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव मदत करतात.आपल्या मित्राला आपण वाटेल तसे बोलतो,वाईट बोलतो, चेष्टा करतो ,पण आपल्या जागेवर असं कुणी काही बोललं तर मात्र ते आपल्याला असह्य होत. हेच या नात्यातलं वेगळेपण असत.
या नात्यामध्ये कधीच कुठली बंधने नसतात,मर्यादा नसतात म्हणूनच हे नातं इतर नात्यांपेक्षा सुंदर असत. निस्वार्थ असं हे नातं असत आणि मैत्री मध्ये स्वार्थ असेल तर ती मैत्री कुठली! म्हणून या नात्यामध्ये अनोळखी अशा व्यक्तीसोबत आपण जन्मभरासाठी जुळले जातो,यामध्ये आपण कितीही पुढच्यावर रागावलो, रुसलो तरीसुद्धा या नात्यात किंचितही फरक पडत नाही उलट हेच रुसवे- फुगवे या नात्यातील प्रेम अधिक वाढवत असतात .
मैत्री हा शब्द एकला तर प्रत्येकाला आपल्या अत्यंत जवळील व्यक्तीची आठवण येते ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आपला जिवलग मित्र / मैत्रीण असते .
खरंच हे नातं अमर्याद असत, हे जात, धर्म, पंथ, वय, लिंग, याच विचार न करणार सुंदर असं नातं असते .रक्ताच्या नात्याइतकेच मैत्रीचे नातेदेखील घट्ट असते , मैत्रीत कसलाही भेदभाव नसतो , मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्वाची असते कारण प्रेम तर सगळ्यांनाच एकदा तरी रडवते मात्र मैत्री दुःखात हसवते .
मैत्री ही माणसांची माणसांसोबत व्हावी असे गरजेचे नाही तर ती प्राणी, पक्षी, वृक्ष अगदी कुणासोबतही होऊ शकते, फक्त तिथे जिव्हाळा, प्रेम, काळजी या गोष्टींची गरज असते .प्रत्येकासाठी हे नातं वेगळ्या स्थानावर असते खर तर हे नातं माझ्यासाठी सर्वोच स्थानावर आहे .
असं हे मजेदार असं नकळत नातं शब्दात मांडणं अशक्यच आहे.
शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते.
"मैत्री " ही अशीच असते ,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी ,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी ,
दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी ,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दविना सगळेकाही समजून घेणारी ,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी . . . . . . . . . . . . .
. मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या डावात भिजून
चिंब चिंब नगळी
जगावे असे की मरणे अवघड होईल
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.साय म्हणजे गुलामी नव्हे.
मैत्री
नातं "मैत्री "च

,
हसावे असे कि रडणे अवघड होईल ,
कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल ,
पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल.
निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता.त्या सहजतेमधुन सुरक्षीतपणाची साय आपोआप धरते.साय दुधातुन तयार होते आणि दुधावर छत धरते.साय म्हणजे गुलामी नव्हे.
सायीखालच्या दुधाला सायीचं दडपण वाटत नाही.
मैत्री तशी असावी. दुधापेक्षा स्निग्ध.
सायीची नंतरची सगळी स्थित्यंतर म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्त पौष्टिक असतात.
तसं मैत्रीचं घडावं.
"मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्षबिंदु ठरावा."
VMS
आमचा हा लेख आवडला असेन तर नक्की कंमेंट करून कळवा
आमच्या पेज ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

we invested for longer journey....