❉मैत्री



दोस्त, मित्र, यार, सखा,अशा कितीतरी नावांनी संबोधले जाणारे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच.खरे तर ज्या चहात साखर नसते .ते पिण्यात मजा नसते.तसेच ज्या जीवनात मित्र नसतात असे जीवन जगण्याचा सुद्धा मजा नसते.

               बालपणापासून बनलेले मित्र हे काहींच्या जीवनात वेळ व काळानुसार बदलतात.तर काही तसेच राहतात. हे मैत्रीचं नात पण वेगळं असत यातही बरेच प्रकार असतात काही नावापुरते असतात. काहीजण जवळ असतात .काही कामपुरते मर्यादित असतात.तर काही फार जिवलग असतात.

               खरे तर जे जिवलग असतात तेच खरे मित्र असतात आणि असे मित्र प्रत्येकाला मिळतातच.काहींना बालपणापासून काहींना शाळा कॉलेजमध्ये तर काहींना जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर.

                मैत्रीचे हे नाते अबोल असते तिथे आनंद दाखवण्यासाठी हास्य किंवा दुःख सांगायला आसवांची गरज नाही लागत.कारण ते न  बोलताच समजले जाते.

                 रक्ताचं नात नसल तरी ते वेगळंच नात गुंपल जात.अचानक आपलंसं होत .आपले आनंद आणि दुःख त्यांच्या विना अपूर्णच राहतात.कधी कुठे मित्र म्हणून नाव ऐकलं तर चटकन त्यांची आठवण येते.जीवनातील प्रत्येक अडचणीत त्यांच्या बरोबर संवाद साधल्याने अडचनाच नाहीशी होते.

                   आपले गुपित,आवडी-निवडी,स्वभाव यांची जाण त्यांना कळून असते.त्यामुळे कितीही मोठं वादळ आलं तरीही हे आपले जिवलग यार आपल्यासाठी नेहमी तयार असतात.हे मित्र वेळेपुरते मर्यादित नसतात.तर मित्रांसाठी वेळ देणारे असतात.असे म्हणतात की पावसात जेवढा ओलावा नसेल तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो आणि मैत्री मधल्या सावलीचा अर्थ उन्हात गेल्यावर कळतो.

                    कधी शब्द नकळत कानावर पाडतात कोणी दूर असूनही उगाच जवळ वाटतात. खरंतर ही मैत्रीची नाती अशीच असतात . आयुष्यात येतात आणि आयुष्याचं बनून जातात .वेळ प्रसंगी आलेल्या अडचणीला सग्या सोयऱ्या पेक्षा या मैत्रीतील नात्यातील लोकांची आगळीवेगळी मदत असते. कधीतरी या रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचेच नातं श्रेष्ठ वाटते.






click on image to see another post


2 تعليقات

‏قال VMS....
खूप छान🤗 मैत्री चं महत्त्व लक्षात येते।।
أحدث أقدم